नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज (20 नोव्हेंबर) होणार आहे. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर एक घातक वेगवान गोलंदाजही संघात परतला आहे. टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजासाठी ही मालिकाही महत्त्वाची ठरणार आहे. या खेळाडूला काही सामन्यांनंतरच संघातून वगळण्यात आले.

या” खेळाडूचे संघात पुनरागमन

न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला स्थान देण्यात आले आहे. तो आयपीएल 2022 पासून चर्चेत आहे, परंतु काही काळासाठी तो टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकला नाही. मात्र, यावेळी त्याने टी-20 तसंच एकदिवसीय संघातही आपलं स्थान निश्चित केलं आहे. काश्मीरचा रहिवासी उमरान मलिक 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो.

उमरान मलिकने यावर्षी आयर्लंडविरुद्ध पदार्पण सामना खेळला. मात्र, उमरान मलिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयपीएल 2022 च्या चमकदार कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही आणि केवळ 3 सामने खेळल्यानंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. उमरान मलिक आता पुन्हा एकदा संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी सज्ज झाला आहे.

उमरान मलिकने टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 12.44 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत आणि फक्त 2 विकेट घेतल्या आहेत. त्याची खराब कामगिरी पाहून त्याला संघातून वगळण्यात आले. उमरान मलिकने टीम इंडियासाठी शेवटचा सामना जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. आणि आयपीएल 2022 मध्ये उमरान मलिकने 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या.