नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यात एका गोलंदाजालाही कर्णधार शिखर धवननेही संधी दिली आहे जो काही काळ प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. विशेष म्हणजे हा खेळाडू प्रथमच वनडे संघात खेळताना दिसणार आहे.

कर्णधार शिखर धवनने युवा घातक वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा पहिल्या वनडेच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश केला आहे. उमरान मलिक प्रथमच भारताच्या वनडे संघाचा भाग बनला आहे. उमरान मलिक देखील टी-20 मालिकेचा भाग होता, परंतु तो प्लेइंग 11 चा भाग होऊ शकला नाही. काश्मीरचा रहिवासी असलेला उमरान मलिक हा 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.

उमरान मलिकने टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 12.44 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत आणि फक्त 2 विकेट घेतल्या आहेत. त्याची खराब कामगिरी पाहून त्याला संघातून वगळण्यात आले. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. संघातील स्थान पक्के करण्याच्या इराद्याने तो पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

टीम इंडियाची प्लेइंग 11 

शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजेवेंद्र चहल.