नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत विजयाची नोंद केल्यानंतर टीम इंडियाची ‘अ’ गटातील दुसऱ्या सामन्यात हाँगकाँग संघाशी लढत होणार आहे. आजच्या सामन्यातील विजयामुळे टीम इंडियाचे सुपर फोरमधील स्थान निश्चित होईल. आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ टी-२० फॉर्मेटमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल.

या सामन्यात टीम इंडियाच्या अनेक फलंदाजांना फॉर्म मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. दुखापतीनंतर केएल राहुलसाठी पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला टी-२० सामना होता आणि तो खाते न उघडताच बाद झाला. या सामन्यात तो आपला फॉर्म शोधण्याचा प्रयत्न करेल. तुम्हालाही भारत आणि हाँगकाँग यांच्यातील या रोमांचक सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर या सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा आशिया कप सामना कधी होणार आहे?

भारत आणि हाँगकाँग यांच्यात हा आशिया चषक सामना बुधवार, 31 ऑगस्ट रोजी होणार आहे.

भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा आशिया कप सामना कुठे होणार आहे?

भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा आशिया कप सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा आशिया चषक सामना किती वाजता?

भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा आशिया चषक सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा आशिया चषक सामना तुम्ही कुठे पाहू शकता?

भारत आणि हाँगकाँग यांच्यातील हा आशिया कप सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर पाहता येईल.