मुंबई : 1 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जाणार आहे, जो कोरोनामुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आला होता. इंग्लंड दौऱ्यावर भारताला तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यात ट्विटरवर युद्ध सुरू झाले आहे.

वसीम जाफर आणि मायकल वॉन यांच्यात ट्विटरवर रंगले युद्ध

त्याचं झालं असं की, भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरून स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा फोटो शेअर करत वसीम जाफरने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘क्रिकेटच्या घरात सूर्य चमकत आहे आणि हवामान आल्हाददायक आहे.’ यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने वसीम जाफरच्या या फोटोवर खिल्ली उडवली.

मायकेल वॉनची प्रतिक्रिया

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने वसीम जाफरच्या या फोटोची खिल्ली उडवली आणि लिहिले, ‘वसिम, माझ्या पहिल्या कसोटी विकेटला २० वर्षे झाले म्हणून तू इथे आला आहेस का?’

2002 मध्ये लॉर्ड्सच्या याच मैदानावर मायकेल वॉनने वसीम जाफरला बाद करून कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवली होती. यामुळेच मायकल वॉनने वसीम जाफरचा पाय खेचला आहे. मात्र, त्यानंतर वसीम जाफरनेही मायकल वॉनला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

वसीम जाफरचे सडेतोड उत्तर

यानंतर वसीम जाफरने आणखी एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “मायकल, मी याला 15 वर्षे पूर्ण करत आहे.’ वसीम जाफरने शेअर केलेला फोटो 2007 च्या इंग्लंड दौऱ्यातील भारताच्या कसोटी मालिकेतील विजयाचा आहे. त्यानंतर राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली.

Leave a comment

Your email address will not be published.