नवी दिल्ली : 4 डिसेंबर पासून भारतीय संघाला बांगलादेश विरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. ज्यासाठी टीम इंडिया बांगलादेशमध्ये पोहोचली आहे. त्याच वेळी, भारतीय निवड समितीने पुन्हा एकदा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संघात स्थान दिलेले नाही. यावरून सर्वत्र प्रश्न उपस्थिती झाले होते, त्याचवेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरानेही उमरानबाबत वक्तव्य केले आहे.

आशिष नेहराने एक मुलाखतीत सांगितले की, “उमरान मलिकने केवळ न्यूझीलंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली यात शंका नाही. यापूर्वीही त्याने असे केले आहे. प्रत्येकजण त्याच्यासाठी खूप उत्सुक आहे. तो फक्त 4 षटके टाकणारा खेळाडू नाही. त्याने नुकतीच टी-20 कारकिर्दीला सुरुवात केली आहे. मी त्याला 16-20 षटके वेगवान गोलंदाजी करताना पाहिले आहे. फक्त टी-२० क्रिकेट खेळायला आलेल्या खेळाडूंपैकी तो नाही.

आयपीएल मधील उत्तम कामगिरीनंतर उमरान मलिक आज जगभरात वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानंतर त्याला आयर्लंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 6 सामने खेळले आहेत. त्याने 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने अनुक्रमे 3 आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत.