अनेकदा असे पाहण्यात येते की, पुरुष आकर्षक शरीरयष्टी व मजबूत शरीर बनवण्यासाठी खूप मेहनत घेतात. यासाठी व्यायाम अथवा जिम करून आपला फिटनेस आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु जिम करून देखील कोणत्या ना कोणत्या कमतरतेमुळे हवे तसे बायसेप्स बनत नाहीत.
अशावेळी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत ज्याने बायसेप्स घडवण्यासाठी मदत होईल.चला तर जाणून घेऊया मजबूत व मोठे बायसेप्स बनवण्यासाठी आहारात कोणत्या प्रकारचे पदार्थ खावेत.
१. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट अन्न
स्नायू मोठे करण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्ब्सची आवश्यकता असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यासाठी होल ग्रेन ब्रेड, ओटमील, ब्राऊन राइस, हिरवे वाटाणे, क्विनोआ, बटाटे आणि पास्ता यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
२. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ
कोणताही स्नायू बनवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. हे स्नायू पुनर्प्राप्त करण्यात देखील मदत करते. प्रथिने मिळवण्यासाठी तुम्ही शेंगा, दही, चणे आणि चिकन ब्रेस्ट यांसारखे उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ खावेत.
३. निरोगी चरबीयुक्त पदार्थ
बायसेप्स मोठे करण्यासाठी तुम्हाला चरबीची देखील आवश्यकता आहे. सर्व प्रकारचे फॅट्स वाईट नसल्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात चांगल्या फॅट्सचा समावेश करावा. उदाहरणार्थ, ऑलिव्ह ऑईल, एवोकॅडो, पीनट बटर आणि मासे यासारखे चांगले चरबीयुक्त पदार्थ खावेत.