‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम माया अर्थातच अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. दर दिवसाआड ती आपल्या चाहत्यांसोबत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. दरम्यान, रुचिराने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी तिच्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

रुचिरा जाधवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने चिपळूण जंक्शनवरील आपला एक फोटो शेअर करत आपल्या या भेटीबद्दल सांगितलं आहे. रुचिराने फोटो शेअर करत लिहिलं आहे, ”खूप वर्षांनी गावी गेले होते. खूप वर्षांनी ट्रेनने प्रवास केला…. तेही एकटीने’. अभिनेत्री शिमग्यासाठी आपल्या गावी गेली होती. रुचिराने तिथे जाऊन अनेक सुंदर ठिकाणांना भेटीसुद्धा दिल्या आहेत. त्याचे काही व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सध्या बंद झाली असली, तरी या मालिकेतील कलाकार आजही सतत चर्चेत असतात. या मालिकेतूनच रुचिराला एक खास ओळख मिळाली होती. रुचिरा आपल्या कामानिमित्त सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. गेली अनेक वर्षे ती मुंबईत राहात आहे. ती मूळची चिपळूणची आहे. सतत कामात व्यग्र असल्याने फारसं कधी गावी जाणं होत नाही आणि म्हणूनच अभिनेत्रीला आपल्या गावाची आठवण येत असते. यंदा मात्र अभिनेत्रीने वेळात वेळ काढून आपलं गाव गाठलं होतं. अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितलं आहे.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *