लहान बाळाचे शरीर हे खूप नाजूक व कमकुवत असते. हे मजबूत बनवण्यासाठी बाळाचे आईवडील वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेत असतात. पण तुम्हाला माहित आहे का यासाठी तेलाने मालिश करणे खूप फायदेशीर ठरते. याने हाडे व स्नायू मजबूत होतात. यामुळे मुलांची लवकर वाढ होण्यास मदत होते. विशेषतः उन्हाळ्यात तेलाने मालिश केल्याने बाळाला ताजेतवाने वाटते व शरीराला थंडावा मिळतो.

तेलाची मालिश केल्याने बाळाचे शरीर शांत होऊन त्यास योग्य झोप लागते. यामुळे बाळाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यांसारखे अनेक फायदे तेलाने मालिश केल्याने बाळाच्या आरोग्याला होतात. चला तर मग जाणून तेलाने मालिश केल्याने बाळाच्या शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबत.

बाळाची मालिश करताना योग्य तेल देखील निवडणे गरजेचे आहे. जे बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

बाळाची मालिश करण्याचे तेल

उन्हाळ्यात बाळाला मालिश करताना कूलिंग ऑईल निवडा. किंवा खोबरेल तेलाने मसाज करू शकता. त्वचा खोबरेल तेल सहजपणे शोषून घेते. त्यात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करतात. याशिवाय उन्हाळ्यात तिळाच्या तेलानेही मसाज करू शकता. त्यामुळे हाडे मजबूत होतात.

बाळाच्या मालिशचे फायदे

१- बाळाला मसाज केल्याने अनेक फायदे होतात. मालिश केल्याने बाळाला सुरक्षित वाटते आणि कमी रडते.              २- मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीरात उबदारपणा येतो.
३- मसाज केल्याने हात आणि पायांमध्ये रक्त प्रवाह सुधारतो. याशिवाय पचनक्रिया चांगली राहते.
४- तेलाने मसाज केल्याने शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप लागते.
५- मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांना मसाज केल्याने वजन वाढते, हृदय गती संतुलित राहते.
६- असे म्हणतात की डोक्याला मसाज आणि चंपिंग केल्याने मुलांचा मेंदू देखील चांगले काम करतो.
७- बाळाला मसाज केल्याने हाडे मजबूत होतात आणि मूल चपळ होते.
८- मालिश करताना मूल रडते, ज्यामुळे घसा उघडतो आणि भूक लागते.

Leave a comment

Your email address will not be published.