महाअपडेट टीम, 25 जानेवारी 2022 : आज शेअर बाजारात 1000 पेक्षा जास्त पॉइंट्सची घसरण झाली आहे. बाजारात मोठी घसरण झाली असूनही, काही शेयर्स मध्ये जोरदार वाढ झाली आहे,असाच एक स्टॉक म्हणजे जैनको प्रोजेक्ट्स (इंडिया) लिमिटेड (Jainco Projects India). 

कंपनीचे शेअर्स काल (सोमवार) ट्रेडिंग दरम्यान 5 टक्क्यांनी वाढले आणि 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. बीएसईवर (BSE) हा शेअर आज 5 टक्क्यांच्या मजबूतीसह 11.34 रुपयांच्या लेव्हलवर ट्रेंड करत आहे.

1,925% वार्षिक रिटर्न्स :-

एका वर्षात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger penny stock) ₹0.56 (28 जानेवारी 2021 रोजी BSE वर बंद किंमत) वरून ₹11.34 (24 जानेवारी 2022) पर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेयर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 1,925% रिटर्न्स दिले आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांत, हा स्टॉक रु 5.31 (जुलै 26, 2021) वरून 11.34 रुपयांपर्यंत वाढला आहे, या दरम्यान या स्टॉकने 116% रिटर्न्स दिले आहे.

तसेच गेल्या 5 व्यापार दिवसांमध्ये, हा स्टॉक 21.41% वाढला आहे. त्यामुळे, हा पेनी स्टॉक (Penny stock) 2022 साठी देखील संभाव्य मल्टीबॅगर पेनी स्टॉकपैकी एक मानला जाऊ शकतो. आणि भविष्यातही हा स्टॉक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुंतवणूकदार झाले करोडपती…

JainCo Projects (India) कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या इतिहास बद्दल जाणून घेतलं तर. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये ₹1 लाख गुंतवले असतील, तर आज त्याचे ₹ 1 लाख असतील. ₹ 20.25 लाख झाले आहेत.

जर 6 महिन्यांपूर्वी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज ₹ 2.13 लाख झाले असते. म्हणजेच गुंतवणूकदारांना 6 महिन्यांत दुप्पट नफा झाला असता..

काय आहे कंपनीचा बिझिनेस ?

Janco Projects (India) Limited भारतात कंस्ट्रक्शन व्यवसायात गुंतलेली आहे. ते तयार मिक्स कॉंक्रिटची ​​खरेदी आणि विक्री करते. कंपनी लिक्विफाइड (liquefied) पेट्रोलियम गॅसचाही व्यवहार करते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *