आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जाएंट्सवर अवघ्या  3 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानने दिलेल्या 166 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 ओव्हरमध्ये 162/8 पर्यंतच मजल मारता आली.

अखेरच्या षटकात लखनऊला विजयासाठी १५ धावा करायच्या होत्या. पण राजस्थानचा युवा गोलंदाज कुलदीप सेनने भेदक मारा केला आणि संघाला तीन धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

मार्कस स्टॉयनिस 17 बॉलमध्ये 38 रनवर नाबाद राहिला, त्याने 2 फोर आणि 4 सिक्स मारले. याशिवाय क्विंटन डिकॉकने 39, कृणाल पांड्याने 22 आणि दीपक हुड्डाने 25 रनची खेळी केली.

तत्पूर्वी या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 165/6 पर्यंत मजल मारली. शेमरन हेटमायरने 36 बॉलमध्ये 59 रनची आक्रमक खेळी केली, यात 6 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. देवदत्त पडिक्कलने 29 आणि आर.अश्विनने 28 रन केले. लखनऊकडून होल्डर आणि गौतमला प्रत्येकी 2-2 आणि आवेश खानला 1 विकेट मिळाली.

लखनऊविरुद्धच्या या विजयामुळे राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने या मोसमात 4 पैकी 3 मॅच जिंकल्या असून एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे लखनऊची टीम क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, लखनऊने 5 पैकी 3 विजय मिळवले आणि 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *