महाअपडेट टीम, 5 फेब्रुवारी 2022 : पुण्यातील शाळांबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील शाळा मंगळवार 1 फेब्रुवारीपासून पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग हे हाफ डे पद्धतीने सुरु करण्यात आल्या आहेत.
परंतु आता कोरोना परिस्थिती पाहता आता संपूर्ण वर्ग हे पूर्णवेळ भरणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार यांनी दिली.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आलेली असतानाच सरकारने सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र चार दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आठवी पर्यंतचे वर्ग हे हाफ डे पद्धतीने सुरु करण्यात आले होते.
परंतु आज शनिवारी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान पुणे जिल्ह्यात कोरोना निर्बंधात कोणतीही शिथिलता नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुण्यात सद्यस्थितीला 45 टक्के रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईत निर्णय घेणार नाही.
अजून एकदोन आठवडे थांबूनच मगच कोरोना निर्बंधाच्या शिथिलते बाबत निर्णय घेण्यात येणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली.