राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.
2022-23 या वर्षाच्या खरीप हंगामाकरिता एक लाख टन युरिया आणि 50 हजार टन डीएपी तसेच रब्बी हंगामासाठी 50 हजार टन युरिया म्हणजेच दोन लाख टन खतांचा संरक्षित साठा करण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे.
दरम्यान याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मागील खरीप हंगामात खतांचा तुटवडा होऊ नये यासाठी सरकारने बफर स्टॉक केला होता.
त्यामुळे शेतकर्यांना पुरेशा प्रमाणात खते मिळाली होती. त्यामुळे आता यंदाही सरकारने तसाच निर्णय घेतला आहे. जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होत आहे.
खरीप हंगामातील पेरणीच्या वेळी व उभ्या किंना खतांना दुसरा हप्ता देणे यामुळे युरिया व डिएपी खतांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते.
शेतकर्यांच्या मागणीप्रमाणे खतांची उपलब्धता होण्यासाठी खरीप हंगाम 2022 करीता युरिया व डिएपी खतांचा व रब्बी 22-23 साठी युरिया खतांचा संरक्षित साठा करून ठेवणे आवश्यक आहे.
एप्रिल 2022 पासून युरिया व डिएपी खतांचा साठा करण्यास सुरूवात केल्यास, त्याचा उपयोग जून महिन्यात होणार आहे. दरम्यान या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले झाले असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पेरणी करणार आहे.
आणि पेरणी करण्यासाठी रासायनिक खते आवश्यकता आहे. आणि याचा विचार करता राज्य सरकारने ज्या खत उत्पादन कंपन्या आहेत. तसेच शेतकरी यांना सूचना केलेली आहे की जो खतांचा साठा आहे. तो सुरक्षित करून ठेवा.