आपल्या सर्वांनाच माहित आहे की हिवाळा सुरू झाला की खाण्यापिण्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण हिवाळ्यात अनेक प्रकारचे पदार्थ आपण आहारात समावेश करत असतो. अशा स्थितीत जर तुम्ही सुकामेवा आहारात समावेश केलातर शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहील.

विशेषत: हिवाळ्यात ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्यास अनेक फायदे दिसून येतात. म्हणूनच या पाच ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करण्यात अजिबात उशीर करू नका.

बदाम


बदामाला ड्रायफ्रुट्सचा राजा म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. बदामामध्ये फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, झिंक, व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. यासोबतच बदामाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण आणि हिमोग्लोबिनची पातळीही सुधारते. यासोबतच बदामाने कोलेस्ट्रॉलची पातळीही चांगली राहते. भुकेच्या वेळी खाल्ल्यास फक्त काही बदाम तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करतात. तसेच, त्याचा उबदार प्रभाव हिवाळ्यात तुम्हाला फायदेशीर ठरतो.

काजू


काजू हे आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये खूप गुणकारी असल्याचे सांगितले जाते. काजू शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवते. काजूच्या सेवनाने उच्च रक्तदाबाची पातळीही योग्य ठेवता येते. मायग्रेनच्या दुखण्यावरही काजू गुणकारी आहे. काजूमध्ये व्हिटॅमिन ई देखील भरपूर असते. तसेच ते तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले आहे.

अक्रोड


हिवाळ्यात अक्रोड खाणे खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यात खूप मदत करतात. अक्रोडाचे सेवन त्वचा आणि केसांसाठी देखील खूप चांगले आहे.

अंजीर


अंजीर हे असे ड्रायफ्रूट आहे, ज्यामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर उपलब्ध असतात. अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, बी1, बी12, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अंजीराच्या मदतीने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हिवाळ्यात याचे सेवन करणे खूप चांगले आहे.

पिस्ता


सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट घटक पिस्त्यात आढळतात. पिस्त्याचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण होते, ज्यामुळे तुमची त्वचा तरुण राहते.