आपण आपल्या रोजच्या आहारात विविध कडधान्यांचा समावेश करत असतो. कारण यामध्ये प्रथिनांची मात्रा जास्त असते, जी आपल्या शरीरासाठी पोषक असते. मात्र कडधानांमध्ये डाळींचा फायदा जास्त प्रमाणात होतो असे आपण मानतो.
परंतु यापैकी काळ्या उडीदाची डाळ खाल्ल्याने तुमच्या शरीराची समस्या वाढवू शकते. ही डाळ खाल्ल्याने शरीराला अनेक त्रासांना सामोरे जावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया काळी उडीदाची डाळ खाल्ल्याने काय तोटे होतात.
युरिक अॅसिडची समस्या वाढू शकते
काळ्या उडीद डाळीचे जास्त सेवन केल्याने शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते. जर तुमच्या रक्तात आधीच युरिक ऍसिड वाढले असेल तर त्याचे सेवन टाळा. कारण ते खाल्ल्याने किडनीमध्ये कॅल्सिफिकेशन स्टोन वाढू शकतो.
सांधेदुखीचा त्रास वाढेल
या डाळीचे सेवन केल्यास सांधेदुखीचा त्रास वाढतो. जर तुम्हाला आधीच सांधेदुखीची समस्या असेल तर उडीद डाळीचे सेवन करू नका. कारण यामुळे तुमची सांधेदुखीच्या समस्यांत वाढ होईल.
अपचनाची समस्या असणाऱ्यांना याचा त्रास होईल
अपचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी ही डाळ खाऊ नये. कारण या डाळीमुळे तुमची बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. त्यामुळे पोट फुगणे आणि गॅस होऊ शकतो.