बदलत्या जीवनशैलीत अनेक बदल होत आहे. त्यामुळे बरेच लोक समस्यांना सामोरे जात आहेत. विशेषतः तणावाच्या समस्येला त्रस्त आहेत. मात्र, प्रत्येकजण कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली असतो. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

आतापर्यंत असे मानले जात होते की, कामाचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा जबाबदाऱ्यांमुळे माणूस तणावग्रस्त होतो पण आता एका संशोधनात असे समोर आले आहे की, जर तुम्ही तुमच्या जेवणाची योग्य काळजी घेतली नाही तर मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. आणि तणाव देखील वाढू शकतो.

जर तुम्ही तुमच्या आहारात जास्त मीठ खाल्ल्यास किंवा जेवणात अतिरिक्त मीठ घेतल्यास मानसिक तणाव वाढू शकतो. अनेकांना जेवणात जास्त मीठ घेणे आवडते, त्यांच्या या सवयीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

तणाव 75 टक्क्यांनी वाढू शकतो

ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांना मीठ कमी खाण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी, जर तुम्हाला मानसिक आरोग्य सुधारायचे असेल तर तुम्हाला मिठाचे सेवन बंद करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, अधिक मीठ खाल्ल्याने मानसिक तणावाची पातळी सुमारे 75 टक्क्यांनी वाढू शकते, जे शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

तणावामुळे पॅनिक अटॅक वाढू शकतो, खोल श्वास घेण्याच्या व्यायामामुळे मोठा आराम मिळेल

WHO मानक काय आहे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी, एका व्यक्तीने एका दिवसात सुमारे 6 ग्रॅम मीठ खावे. परंतु, बहुतेक लोक त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये सुमारे 9 ग्रॅम मीठ वापरतात. जास्त मीठ हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढवतो. यासोबतच जास्त मीठ खाल्ल्याने वागण्यातही बदल होतो.

शास्त्रज्ञांनी उंदरांवर चाचणी केली

मिठाचा प्रभाव जाणून घेण्यासाठी, एडिनबर्ग स्कॉटलंड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उंदरांवर एक अभ्यास केला. शास्त्रज्ञांनी काही उंदरांना कमी मीठ दिले तर काही उंदरांना जास्त मीठ दिले. जास्त मीठ खाणाऱ्या उंदरांच्या स्ट्रेस हार्मोनमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. तज्ज्ञांच्या मते, जास्त मीठ शरीरात जीन्सची प्रतिक्रिया वाढवते.