आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टाइटन्सला हंगामातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव झाला.
या सामन्यात हार्दिक पांड्याही त्याच्या वाईट वागणुकीमुळे चर्चेत आला होता. हार्दिक पांड्या आपला संघ सहकारी आणि अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर ओरडताना दिसला. लाइव्ह मॅचमध्ये हार्दिक पांड्याने मोहम्मद शमीला कमी प्रयत्न केल्याबद्दल ओरडले होते.
मात्र, या कृत्यानंतर हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल करत लिहिले की, ‘हार्दिक पांड्याने वरिष्ठ खेळाडू आणि भारतीय दिग्गज मोहम्मद शमीचा अपमान केला यावर विश्वास बसत नाही.
शमीने धोकादायक झेल न घेता चौकार वाचवणे पसंत केले होते. कठीण आता प्रसंगात हार्दिकचा राग आणि त्याचे नखरे समोर येत आहेत.’
तर दुसर्या यूजरने लिहिले की, ‘हार्दिक पांड्या कोणत्याही संघाचा कर्णधार होण्याच्या लायकीचा नाही, ज्याला संघातील सदस्यांशी कसे बोलावे हे माहित नाही आणि तेही वरिष्ठला खेळाडूला अशा व्यक्तीने कर्णधार होऊ नये. तुम्ही सर्व खेळ जिंकू शकत नाही.’
तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ‘पांड्याने चांगल्या बॅटिंग ट्रॅकमध्ये 42 चेंडूत 50 धावा केल्या आणि आता तो मोहम्मद शमीसारख्या वरिष्ठ खेळाडूला 50-50 झेल न घेतल्याबद्दल शिव्या देत आहे.
’ एकाने लिहिले की, ‘हा सामना जिंकला नाही तर हार्दिक पांड्या आपल्या संघाला जिवंत जाळतील असे दिसते.’ त्याच वेळी, इतर वापरकर्ते देखील कमेंट्सद्वारे हार्दिकला ट्रोल करताना दिसत आहेत.
षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेव्हा राहुल त्रिपाठीने त्याच्या चेंडूवर डीप थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळला तेव्हा हार्दिकची नाराजी दिसली.
चेंडू बराच वेळ हवेत होता आणि तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद शमीच्या अंगावर पडला. शमीने पुढे जाऊन झेल पकडला नाही. यानंतर हार्दिकला राग अनावर झाला आणि तो शमीवर ओरडताना दिसला.
यानंतर त्याने कर्णधार ऋषभ पंतसोबत ५५ धावांची भागीदारी केली. डेव्हिड वॉर्नरने बाद होण्यापूर्वी 45 चेंडूत 135.56 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा केल्या.
याआधी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने आयपीएल 2016 चे विजेतेपद पटकावले होते. तथापि, नंतर त्याला यपीएल कर्णधारपदावरून वगळण्यात आले आणि नंतर SRH सोबतच्या वादाच्या वातावरणामुळे त्याला संघातून वगळण्यात आले.