नवी दिल्ली : 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. भारताला 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. आशिया चषक टी-20 विश्वचषक 2022 च्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या लेखात 3 भारतीय खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे जे आशिया कपमध्ये अपयशी ठरल्यास, T20 विश्वचषकातून बाहेर पडू शकतात.

आर अश्विन :

आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या संघात कसोटी फिरकी गोलंदाज आर अश्विनची निवड करण्यात आली आहे. संघात रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, आर अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणे थोडे अवघड जात आहे. मात्र, आर अश्विनने आशिया चषकात मिळालेल्या संधींचा फायदा घेतला नाही तर ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळणे त्याच्यासाठी जवळपास अशक्य होईल.

आवेश खान :

रोहित शर्मा आणि व्यवस्थापन युवा गोलंदाज आवेश खानवर जास्त अवलंबून आहे. आशिया चषक आवेश खानसाठी करा किंवा मरो ठरू शकतो, जर आवेश खान आशिया चषकात अपयशी ठरला तर टी-20 विश्वचषकातून तो निश्चितच बाहेर पडू शकतो. आवेश खानने आत्तापर्यंत 13 टी-20 सामन्यात 8.68 च्या इकॉनमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत.

दिनेश कार्तिक :

37 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक टीम इंडियाच्या टी-20 संघात फिनिशर म्हणून खेळत आहे. दिनेश कार्तिक संघासाठी 6 किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करतो, जर तो आशिया कपमध्ये फ्लॉप झाला, तर रोहित शर्मा आणि व्यवस्थापन त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला T20 विश्वचषकाचे तिकीट देऊ शकतात.