icc
ICC announces 'Player of the Month' list; Includes a player of Indian descent

मुंबई : एप्रिल 2022 साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहेत, ज्यामध्ये काही प्रभावी कामगिरीसाठी पुरुष आणि महिला खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज (Keshav Maharaj)आणि सायमन हार्मर (Simon Harmer) यांच्या नावांचा समावेश आहे.

त्यांच्याशिवाय ओमानच्या जतिंदर सिंगचेही नाव या यादीत आहे. आयसीसीने मंगळवारी या नावांची घोषणा केली आई. महिला गटात ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली, इंग्लंडची नताली सीव्हर आणि युगांडाची एमबाबाजी यांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या घरच्या मालिकेत दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने दोन सामन्यांत 16 बळी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात बांगलादेशचा पराभव करत क्लीन स्वीप केला होता.

सहा वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या हार्मरनेही शानदार खेळाचे प्रदर्शन केले. बांगलादेशविरुद्धच्या डरबन कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात नाबाद 38 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने 4 विकेट्सही घेतल्या. हार्मरने दुसऱ्या डावात केशव महाराजांना साथ देत 3 बळी घेतले. दुसऱ्या कसोटीतही त्याने दोन्ही डावात एकूण 6 विकेट्स घेतल्या.

ओमानकडून खेळलेल्या भारतीय वंशाच्या जतिंदर सिंगनेही प्रभावी फलंदाजी केली. एप्रिलमध्ये दुबईत खेळल्या गेलेल्या स्कॉटलंड आणि पीएनजीविरुद्धच्या तिरंगी मालिकेत त्याने जबरदस्त फॉर्म दाखवला होता. ही मालिका ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2 चा भाग होती.

जतिंदर सिंगने चार सामन्यांत 259 धावा केल्या. या धावांमध्ये शतकी खेळीचाही समावेश होता. अशाप्रकारे, त्याच्या दमदार खेळामुळे, या खेळाडूंचा प्लेअर ऑफ द मंथच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Leave a comment

Your email address will not be published.