बई : इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्श क्रिकेट बोर्डाने (ECB) स्टोक्सची इंग्लंड कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
स्टोक्सला नवा कसोटी कर्णधार बनवण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती आणि आता त्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे. स्टोक्सने जो रूटची जागा घेतली असून तो इंग्लंडचा 81 वा कसोटी कर्णधार बनला आहे.
स्टोक्स कर्णधार झाल्यानंतर अनेक लोक त्याचे अभिनंदन करत असून माजी कर्णधार जो रूटनेही स्टोक्सचे अभिनंदन केले आहे. रूटने स्टोक्सचे अभिनंदन करण्यासाठी एक भावनिक संदेशही लिहिला आणि त्याला सांगितले की मी त्याला प्रत्येक टप्प्यावर साथ देईल. स्टोक्ससोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करताना रूटने लिहिले की, एकमेकांना नेहमीच साथ दिली आहे. अभिनंदन मित्रा. मी प्रत्येक वाटेवर तुझ्यासोबत असेन.
Always got each other’s backs. Congratulations mate, I’ll be right with you every step of the way ❤️ pic.twitter.com/KqO3mZpd9X
— Joe Root (@root66) April 28, 2022
रुट हा असा खेळाडू आहे ज्याने इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटीत कर्णधारपद भूषवले आहे
रूटने 64 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले आहे आणि आपल्या देशासाठी सर्वाधिक कसोटी सामन्यांचे नेतृत्व करणारा तो खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 27 सामने जिंकले आहेत आणि 26 गमावले आहेत. गेल्या वर्षभरापासून रूटवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव निर्माण होत होता आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या अॅशेस मालिकेतील 4-0 अशा पराभवानंतर हा दबाव आणखी वाढला.
अॅशेस पराभवानंतरही रुटने इंग्लंड कसोटी संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्याची आणि वेस्ट इंडिजमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, वेस्ट इंडिजमध्येही कसोटी मालिका गमावल्यानंतर रूटकडे कर्णधारपद सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. रुट कर्णधारपदावरून पायउतार होण्यापूर्वीच ख्रिस सिल्व्हरवूडने इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले.