kohli ganguli
"I don't know what's on his mind ..."; Sourav Ganguly's big statement on Virat Kohli's poor form

मुंबई : BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताचा महान फलंदाज विराट कोहलीच्या सध्याच्या फॉर्मबाबत मोठे विधान केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून विराट कोहलीने बॅटने एकही शतक झळकावलेले नाही आणि तो सध्या धावांसाठी झगडताना दिसत आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणतात की विराट कोहलीच्या मनात काय चालले आहे हे माहित नाही, परंतु तो लवकरच फॉर्मात परतेल. भारताचा कर्णधार रोहित शर्माही लवकरच फॉर्ममध्ये येईल, असेही सौरव गांगुलीने म्हंटले आहे.

एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सौरव गांगुली म्हणाला, “विराट कोहली एक महान खेळाडू आहे आणि मला खात्री आहे की तो पुन्हा त्याचा जुना फॉर्म परत मिळवेल. विराट कोहलीच्या मनात सध्या काय सुरू आहे, मला माहीत नाही.

रोहित शर्माही धावांसाठी झगडत आहे

रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल सौरव गांगुली म्हणाला, ‘दोघेही महान खेळाडू आहेत आणि मला खात्री आहे की दोघेही आपली लय शोधतील. आशा आहे की लवकरच त्यांच्या बॅटमधून धावा येतील. विराट कोहलीने IPL 2022 च्या मोसमात 9 सामन्यांमध्ये फक्त 128 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी केवळ 16 इतकी आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 8 सामन्यांत 19.13 च्या सरासरीने केवळ 153 धावा केल्या आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.