मुंबई : अभिनेता विकी कौशल आगामी चित्रपट ‘गोविंदा मेरा नाम’च्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंट दरम्यान, विकी कौशलने त्याच्या आणि पत्नी कतरिना कैफच्या वैवाहिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. कतरिना कैफसोबत लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलले हे विक्की कौशल सांगितले आहे.

‘गोविंदा मेरा नाम’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये विक्की कौशलला विचारण्यात आले की, लग्नानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला? हा प्रश्न ऐकून विकी कौशल आणि कतरिना कैफ आधी हसले, त्यानंतर त्यांनी मजेशीर पद्धतीने उत्तर दिले. विकी म्हणाला, ‘मला या ठिकाणी बदल हा शब्द वापरायचा नाही, इथे काही बदलले आहे असे मी म्हणणार नाही. मी म्हणेन की ते विकसित झाले आहे. जीवन चांगले आहे, शांतता आहे.

विकी कौशल दुसऱ्या एका कार्यक्रमादरम्यान पत्नी कतरिना कैफची स्तुतीसुमने उधळली होती. या कार्यक्रमादरम्यान विकी कौशलने त्याच्या तब्येतीबद्दल सांगितले. तेव्हा विकी म्हणाला, “तुम्हाला माहित नसेल पण माझी पत्नी डॉक्टर आहे, ती एक वैज्ञानिक आहे, तिला खूप ज्ञान आहे. ती मला प्रत्येक गोष्टीत मदत करते माझे अन्न आणि पाणी योग्य आहे याची खात्री करते…’ विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या या गोड नात्याने त्यांच्या चाहत्यांना खूप आकर्षित केले होते.