होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया लवकरच सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय स्पोर्टबाईक CBR150R लाँच करू शकते. दरम्यान या बाईकची स्पर्धा थेट Yamaha R15 V4 सोबत असेल. या बाईकचे डिझाईन साधारणपणे CBR सारखेच आहे.
या बाईकच्या पुढील भागात ड्युअल एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल असल्याचे दिसून आले आहे. तसेच लहान विंडस्क्रीन, स्पोर्टी रीअर व्ह्यू मिरर, खालच्या बाजूस असलेले रुंद हँडल, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, जबरदस्त फ्यूल टँक आणि उत्तम प्रकारे डिझाइन केलेल्या अपस्वेप्ट एक्झॉस्टसह स्टेप-अप सीटचा समावेश आहे. तसेच, हिला दोन्ही चाकांना सिंगल डिस्क ब्रेक आणि एबीएससह इमरजंसी स्टॉप सिग्नल मिळू शकतात.
इंजिन :
बाईकसोबत 149 सीसी लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते. जे 16.09 बीएचपी एवढी शक्ती आणि 13.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये 6-स्पीड गियरबॉक्ससह स्लिप आणि असिस्ट क्लचची सुविधा असू शकते.