हल्ली लग्न समारंभ, व सांस्कृतिक कार्यक्रमात सुंदर दिसण्यासाठी मुली ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मेकअप करत असतात. याने मुलींचे व महिलांचे सौंदर्य उठून दिसते. यामुळे मुलींचे व्यक्तिमत्व प्रभावी दिसते. परंतु लावलेल्या मेकअपपासून त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तो काढणेही खूप महत्वाचे असते.
यासाठी बाजारात विविध प्रकारची उत्पादने विकत मिळतात. पण ती आपल्या चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यासाठी आम्ही आज तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप नैसर्गिकरित्या उतरवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप तर उतरेलच पण त्यासोबतच तुमचा चेहरा फ्रेश व चमकदारही होईल.
काकडी वापरा
उन्हाळ्यात काकडी सहज उपलब्ध होते. याचा वापर तुम्ही मेकअप काढण्यासाठीही करू शकता. यासाठी काकडी सोलून चांगली किसून घ्यावी. आता त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करून चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा आणि मेकअप काढा. काकडी तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करण्यास आणि चमकण्यास मदत करेल.
नारळ तेल उपयुक्त होईल
अनेक महिलांच्या त्वचेच्या काळजीमध्ये नारळ तेलाचा समावेश केला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही ते क्लिन्जर म्हणूनही लावू शकता. कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा. याने सर्व मेकअप सहज उतरेल आणि तुमच्या त्वचेची आर्द्रताही कायम राहील.
दह्याने मसाज करा
प्रथिने आणि खनिजे युक्त दही मेकअप साफ करण्यासोबतच त्वचेची आर्द्रता टिकवून त्वचा मुलायम बनवण्याचे काम करते. यासाठी एका भांड्यात दही घेऊन फेटून घ्या. आता कापूस दह्यात बुडवून हलक्या हातांनी चेहऱ्यावर गोलाकार हालचाली करा. ५ मिनिटांनी चेहरा ताज्या पाण्याने धुवा
बदामाच्या तेलाने मसाज करा
मेकअप काढण्यासाठी तुम्ही बदामाच्या तेलाचीही मदत घेऊ शकता. यासाठी १ चमचा कच्च्या दुधात बदामाचे तेल मिसळा. आता हे मिश्रण कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. दूध तुमची त्वचा कोमल ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्याच वेळी बदामाच्या तेलात असलेल्या व्हिटॅमिन ई-मुळे चेहरा चमकदार दिसू लागतो.