निवडणुकांपुरते इंधन दरवाढ रोखून ठेवत त्यानंतर निकाल जाहीर होताच देशावर महागाईचा बोजा केंद्र सरकारकडून लादण्यात येत आहेः. यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. दरदिवशी इंधनाच्या दरात मोठी वाढ होत आहे.
गेल्या 14 दिवसांमध्ये तब्बल 12 वेळा इंधनदरवाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत 8 रुपये 40 पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. महाराष्ट्रात युवा सेनेकडून थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं होतं. मुंबई पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकलं जातंय. तर, पुणे शहारत 118.29 रुपयांवर पोहोचलंय. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोचलंय.
दरम्यान देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 103.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर, डिझेलचा दर 95.07 रुपयांवर पोहोचलाय. आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोलचा दर 118.81 रुपये तर डिझेलचा दर 103.04 पैशांवर पोहोचला आहे. आज लीटरमागे 40 पैशांची वाढ झाली आहे.
चेन्नईतील पेट्रोलचा दर 109.36 रुपयांवर डिझेलचा दर 99.44 वर पोहोचला आहे. कोलकातामधील पेट्रोलचे दर 113.43 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेल 98.22 रुपयांना विकलं जात आहे. पुण्यात पेट्रोलचे दर देखील वाढले आहेत. पेट्रोलचे दर 118.29 रुपयांवर पोहोचले आहेत. तर पॉवर पेट्रोलचे दर 122.79 रुपयांना विकलं जातंय. डिझेलचे पुण्यातील दर 101.01 वर पोहोचले आहेत. तर,सीएनजी गॅसची किंमत 62.20 रुपयांवर पोहोचले आहेत.