बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात.

दरम्यान, नुकताच सनी लिओनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पती डॅनियल वेबरसोबत बास्केटबॉल खेळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सनीचा लूक पाहून चाहते घायाळच झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते कि, सनी पती डॅनियल वेबरसोबत बास्केटबॉल खेळताना दिसत आहे. यावेळी ती नवऱ्याकडून बास्केटबॉल हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते पण ती तसे करण्यात अपयशी ठरते. या व्हिडीओमध्ये आणखी एक खास गोष्ट म्हणजे सनी लिओनीने लाल रंगाची हॉट साडी नेसली आहे आणि ती साडीत मोठ्या जोमाने गेम खेळत आहे.

सनी लिओनीने आपल्या पतीसोबत बास्केटबॉल खेळताना या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे, ‘टॅग युवर बेस्ट फ्रेंड’. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. व्हिडिओ पोस्ट होऊन फक्त 2 तास झाले आहेत तरी इतक्या लवकर त्याला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, हजारो कमेंट करत व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती, 2011 मध्ये ‘बिग बॉस’ शोमधून प्रकाशझोतात आली होती. यानंतर तीने ‘जिस्म 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय ती ‘रागिनी एमएमएस 2’ मध्येही दिसली होती. पण सध्या ती साऊथच्या सिनेमांमध्ये बिझी आहे. याच्या काही काळापूर्वी ती ‘अनामिका’ या अॅक्शन वेब सीरिजमध्येही दिसली होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *