मायग्रेन ही एक नुरोलॉजिकल आरोग्य समस्या आहे. यामध्ये पेशण्टला प्रचंड डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. यात डोक्याचा अर्धा भाग सतत दुखतो. याने पेशण्टला मळमळ किंवा उलट्या मोठ्या प्रमाणात होतात.
आपल्या रोजच्या आंबट, उष्ण खाद्यपदार्थांच्या वासाने मायग्रेनचा झटका येतो. तसेच तीव्र उष्णता, सूर्यप्रकाश यामुळेही मायग्रेनचा झटका येतो. यावर पूर्ण औषधोपचार नसले तरी यावर उपयुक्त असणारे काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याच्या मदतीने उन्हाळ्यात मायग्रेन टाळण्यासाठी फायदेशीर ठरेल.
१. हायड्रेटेड रहा: घराबाहेर पडताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा. दिवसातून किमान २ ते ३ लिटर पाणी प्यावे.
२. आहाराकडे लक्ष द्या: कॉफी, रेड वाईन, चॉकलेट, चीज ऐवजी आंबा, टरबूज, काकडी आणि हिरव्या पालेभाज्या खा.
३. टोपी आणि शेड्स वापरण्याची खात्री करा: कडक सूर्यप्रकाशात टोपी घातल्याने डोक्याला थेट सूर्यप्रकाश पडत नाही आणि तुम्ही मायग्रेनचा अटॅक टाळता.
४. सौंदर्य प्रसाधने: सनस्क्रीन निवडताना, सुगंध-मुक्त उत्पादनांचा वापर करा.
५. AC चे तापमान नियंत्रणात ठेवा: मानवी शरीरासाठी २५-२७°C हे आदर्श तापमान आहे.
६. काटेकोर दिनचर्या पाळणे: वेळेवर खा आणि झोपा. तुम्ही सुट्टीवर असलात तरीही जेवण कधीही वगळू नका.
७. सूर्यप्रकाश टाळा: कडक सूर्यप्रकाशात बाहेर न जाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला बाहेर जायचे असेल किंवा व्यायाम करायचा असेल तर सूर्यप्रकाश नसताना वेळ निवडा. हे तुम्हाला निर्जलीकरण आणि उष्णतेच्या थकवापासून वाचवेल.
८. ताण व्यवस्थापन: तणाव घेऊ नका आणि तुमचे काम सोपे करण्याचा प्रयत्न करा, वेळेचे व्यवस्थापन करायला शिका. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर सर्व कामाचा बोजा स्वतःवर घेऊ नका, फक्त तुमच्या टीममध्ये काम वाटून घ्या. वेळोवेळी ब्रेक घ्या. शरीराला पूर्ण विश्रांती द्या.
मायग्रेनचा झटका आल्यास काय करावे?
शांत, अंधार असलेली जागा शोधा, जेणेकरून तुम्ही आराम करू शकता आणि हायड्रेट करू शकता. एक ग्लास पाणी प्या, कोल्ड कॉम्प्रेस वापरा, औषध घ्या. प्रत्येक प्रकारची डोकेदुखी टाळण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु आपण काही उपायांच्या मदतीने ते कमी करू शकतो.