हल्ली डोळे खाजवणे, डोळे लाल होणे, डोळे सुजणे यांसारख्या डोळ्यांच्या समस्यांनी सतत त्रास होत असतो. तर झोपेच्या कमतरतेमुळेही डोळ्यांचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. योग्य झोप न झाल्यास डोळे लगेचच सुजतात, किंवा डोळ्यातून पाणी येते. या समस्यांवर शक्य तेवढ्या लवकर इलाज केल्याने डोळ्यांना आराम मिळतो.
अशावेळी घरगुती उपाय करुनही डोळयांची सूज व डोळयांचा त्रास कमी करता येऊ शकते. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत याच्या वापराणे तुमच्या डोळ्यांना चांगला फायदा होईल.
डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय
फ्रिजमध्ये ठेवलेला थंड चमचा
स्वयंपाकघरातून एक गोल चमचा घ्या आणि फ्रीजमध्ये १५ मिनिटे ठेवा. आता त्याची विरुद्ध बाजू बंद डोळ्यांवर ठेवा आणि ती दाबा. तुम्ही हे १० मिनिटांसाठी करा. रात्री झोपण्यापूर्वी हे केल्यास चांगले होईल. तुमच्या डोळ्यातील सूज संपेल.
ग्रीन टीच्या पिशव्या
ग्रीन टीच्या पिशव्यांच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखालील सूज दूर करू शकता. या पिशव्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करू शकता. चहा बनवल्यानंतर उरलेल्या ग्रीन टीच्या पिशव्या फ्रीजमध्ये ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे तुमचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला बरे वाटेल.
जास्त पाणी प्या
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि सूज येऊ शकते. अशा परिस्थितीत स्वत:ला जास्तीत जास्त हायड्रेट करा आणि भरपूर पाणी प्या. याशिवाय डोळ्यांवर थंड पाणी शिंपडल्यास थकवा आणि डोळ्यांची सूज कमी होईल.
काकडी
काकडी फ्रीजमधून काढा आणि त्याचे काप डोळ्यांवर ठेवा. ते १० मिनिटे बदलून डोळ्यांवर ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी काकडीचे गोल तुकडे नियमितपणे डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुजण्याची समस्याही दूर होईल.
गुलाब पाणी
गुलाबपाणी कापसात बुडवून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांतील सूज दूर होईल. याने डोळ्यांना योग्य आराम मिळेल.