एमजी मोटर इंडियाची नवीन झेडएस ईव्ही आता भारतीय रस्त्यांवर धावत आहे. नवीन झेडएस ईव्ही २०२२मध्ये विभागातील सर्वात मोठी ५०.३ केडब्ल्यूएच बॅटरीसह प्रगत तंत्रज्ञान आहे, जे एका चार्जमध्ये ४६१ किमी प्रमाणित रेंज देते.

एमजी मोटरची सर्वोत्तम तंत्रज्ञान व हरित गतीशीलतेप्रती कटिबद्धता आता नवीन अवतारामध्ये उपलब्ध असलेल्या झेडएस ईव्हीच्या वाढत्या उपस्थितीसंदर्भात ब्रॅण्डच्या नवोन्मेष्कारी व सर्वसमावेशक इकोसिस्टिम दृष्टीकोनामधून दिसून येऊ शकते.

नवीन झेडएस ईव्हीमध्ये आकर्षक एक्स्टीरिअर डिझाइन घटक, आरामदायी व प्रि‍मिअम इंटीरिअर, विभागातील प्रथम वैशिष्ट्ये जसे ड्युअल पेन पॅनोरॅमिक स्कायरूफ, डिजिटल ब्ल्यूटूथ® की, रिअर ड्राइव्ह असिस्ट, ३६० ० कॅमेरा, आय-स्मार्टसह ७५ हून अधिक कनेक्टेड कार वैशिष्ट्ये, हिल डिसेण्ट कंट्रोल अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांची भर करण्यात आली आहे. तसेच या कारमध्ये जागतिक स्तरावर प्रमाणित (एएसआयएल-डी, आयपी६९के व यूएल२५८०) बॅटरी आहे, जिने आग, अपघात, धूळ, धूर इत्यादी संदर्भात ८ स्पेशल सेफ्टी चाचण्या पार केल्या आहेत.

येथे नवीन झेडएस ईव्हीच्या सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली आहे जी अधिक ग्राहकांना भारतात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्यास प्रवृत्त करेल.

१. अधिक अंतरासाठी सर्वात मोठी व शक्तिशाली बॅटरी: नवीन एमजी झेडएस ईव्हीमध्ये ४४.५ केडब्ल्यूएच बॅटरीच्या ऐवजी आयपी६९के व एएसआयएल-डी मानक असलेली सर्वात मोठी ५०.३ केडब्ल्यूएच बॅटरी आहे. या नवीन बॅटरीसह कार आता एकाच चार्जमध्ये ४६१ किमीची एआरएआय-प्रमाणित रेंज देते. या कारमध्ये नवीन शक्तिशाली मोटर आहे, जी १७६ पीएसची दर्जात्‍मक शक्ती देते, ज्यामुळे कार फक्त ८.५ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करू शकते. तसेच बॅटरीला अतिरिक्त सुरक्षिततेसाठी यूएल२५८० जागतिक प्रमाणन मिळाले आहे.

२. प्रगत सेफ्टी पॅकेज: अद्ययावत झेडएस ईव्ही ६ एअरबॅग्‍स, ३६०-डिग्री कॅमेरा, हिल स्टार्ट/डिसेण्ट कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (टीपीएमएस) या वैशिष्ट्यांसह अधिक सुरक्षिततेची खात्री देते. या कारमध्ये रिअर ड्राइव्ह असिस्ट वैशिष्ट्ये देखील आहेत, ज्यामध्ये ब्लाइण्ड स्पॉट डिटेक्शन (बीएसडी), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) आणि रिअर क्रॉस ट्राफिक अलर्ट (आरसीटीए) आहे, जे मागील बाजूस डाव्या किंवा उजव्या बाजूने येणा-या, पण रिव्हर्स कॅमेरा व सेन्सर्समध्ये न दिसणा-या कार्सना ओळखते.

३. कनेक्टेड कार तंत्रज्ञान: नवीन झेडएस ईव्हीमध्ये एमजीची आधुनिक आय-स्मार्ट कनेक्टेड सिस्टिम आहे, ज्यामध्ये आता ७५ हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्ये आहेत. आधुनिक सिस्टिम ग्राहकाला स्कायरूफ, एसी, म्युझिक, रेडिओ, नेव्हिगेशन अशा बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी १०० हून अधिक कमांड्स वापरण्याची सुविधा देते. तसेच यामध्ये ३५ हून अधिक हिंग्लिश वॉईस कमांड्स असण्यासोबत इन-कार सर्विसेस आहेत- जसे मॅपमायइंडिया, शॉर्टपेडिया आणि जिओ.

४. डिजिटल इन्स्ट्रूमेण्ट क्लस्टर: नवीन एमजी झेडएस ईव्हीमध्ये जुन्‍या ८.०-इंच युनिटच्या ऐवजी अद्ययावत १०.१-इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. तसेच, या कारमध्ये अॅनालॉग डायल्सच्या जागी नवीन ७.०-इंच डिजिटल इन्स्ट्रूमेण्ट क्लस्टर बसवण्यात आले आहे. बाहेरील बाजूस रिडिझाइन केलेल्या फ्रण्ट बम्परव्यतिरिक्त कारमध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प्स आणि डीआरएल एलईडी टेललाइट्सची भर करण्यात आली आहे.

५. एमजी ई-शील्ड: नवीन झेडएस ईव्हीमध्ये खाजगी ग्राहकांसाठी एमजीचे ईशील्ड प्रोग्राम आहे, जे अमर्यादित किलोमीटर्ससाठी मोफत ५ वर्षांची वॉरंटी, बॅटरी पॅक सिस्टिमवर ८ वर्षे / १.५ लाख किमी वॉरंटी देते. तसेच कंपनी ५ वर्षांसाठी २४/७ रोडसाइड असिस्टण्स (आरएसए) आणि ५ लेबर-फ्री सर्विस देते.

सध्या, नवीन झेडएस ईव्ही फक्त टॉप-स्पेसिफिकेशन एक्सक्लुसिव्ह ट्रिममध्ये उपलब्ध असेल, तर बेस-स्पेसिफिकेशन एक्साईट ट्रिम जुलै २०२२ पासून उपलब्ध असेल. सीएएसई (कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड व इलेक्ट्रिक) मोबिलिटी या दृष्टीकोनासह संचालित अत्याधुनिक ऑटोमेकर एमजीने आज ऑटोमोबाइल विभागामधील ‘अनुभवांना’ सुधारित केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published.