कोरोना विषाणूचा संसर्ग आता कुठे कमी होतोय तोच डेंगू व झिका हे किडकांपासून, मच्छरांपासून होणारे आजार पुन्हा चिंता वाढवणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चेतावणी दिली आहे की पुढील महामारी ही झिका आणि डेंग्यू रोगांमुळेच होऊ शकते.

डेंगू सारखीच लक्षण समजला जाणारा झिका व्हायरस हा प्राणघातक व जीवघेणा समजला जातो. तर डेंग्यू, पिवळा ताप, चिकनगुनिया आणि झिका विषाणू यांसारखे आजार सध्या उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात राहणाऱ्या अंदाजे ३.९ अब्ज लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात.

एडिस डासाद्वारे प्रसारित होणारे आर्बोव्हायरस, जगभरात पसरत आहेत.सध्या आर्बोव्हायरस प्रादुर्भावाची तीव्रता वाढताना दिसत आहे.

डब्ल्यूएचओच्या मते, डेंग्यू ताप दरवर्षी १३० देशांमध्ये ३९० दशलक्ष लोकांना संक्रमित करतो. हा डेंग्यू ताप या देशांमध्ये स्थानिक आहे. तर २०१६ मध्ये, झिका विषाणूमुळे मायक्रोएन्सेफली सारखे जन्मजात दोष आढळून आले. त्याची उपस्थिती किमान ८९ देशांमध्ये आढळून आली.

तर पिवळा ताप ४० देशांमध्ये पसरण्याचा उच्च धोका असतो आणि त्यामुळे कावीळ सारखे आजार होतात. आणि डेंग्यूप्रमाणेच गंभीर रक्तस्रावी ताप आणि यामुळे मृत्यू होतो. चिकुनगुनिया जरी कमी प्रमाणात असला तरी, तो ११५ देशांमध्ये आढळतो आणि त्यामुळे गंभीर संधिवात होतो.

यांसारख्या आजारांमुळे धोका वाढत आहे. यात जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यामुळे जगभरातील चिंतेत आणखीन वाढ झाली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *