नवी दिल्ली : न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा व्हीव्हीएस लक्ष्मण हा कर्णधार हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा चाहता झाला आहे. लक्ष्मणचा असा विश्वास आहे की हार्दिक एक हुशार कर्णधार आहे आणि त्याची काम करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे.

लक्ष्मणने हार्दिकसोबत या वर्षाच्या सुरुवातीला आयर्लंड दौऱ्यावर काम केले आहे आणि त्याच्या कर्णधारपदाची प्रशंसा केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये, हार्दिकने गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आणि आपल्या चतुर बुद्धीने त्याने सर्वांना प्रभावित केले. पुढील T20 विश्वचषक 2024 मध्ये खेळवला जाणार आहे आणि अशा परिस्थितीत हार्दिकला T20 फॉरमॅटचे कर्णधारपद देण्याबाबत सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

पहिल्या टी-20 च्या पूर्वसंध्येला गुरुवारी पत्रकार परिषदेत हार्दिकबाबत विचारले असता, लक्ष्मण म्हणाला, “तो एक जबरदस्त कर्णधार आहे. त्याने आयपीएलमध्ये काय केले ते आम्ही पाहिले आहे. आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर प्रथमच संघाचे कर्णधारपद मिळवणे आणि त्यासोबत विजय मिळवले हा काही साधा पराक्रम नाही. मी आयर्लंड मालिकेत त्याच्यासोबत वेळ घालवला आहे. तो हुशार तससह कर्णधारपदासाठी आवश्यक असलेली शांतता आणि संयम देखील आहे. क्रिकेटच्या या स्तरावर, काही वेळा तुमच्यावर प्रचंड दबाव असेल पण कर्णधाराने या स्थितीत शांत राहणे महत्त्वाचे आहे.”

तो पुढे पुढे म्हणाला, “त्याशिवाय त्याची ड्रेसिंग रूममधील उपस्थिती आणि त्याची वागणूक विलक्षण आहे. तो खेळाडूंचा कर्णधार आहे. कोणताही खेळाडू त्याच्यापर्यंत येऊन मोकळेपणाने संभाषण करू शकतो. तो मैदानावर आणि मैदानाबाहेर उदाहरण देऊन नेतृत्व करतो आणि मला ही गोष्ट आवडते.”