नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 2022 संपल्यानंतर लगेचच, बीसीसीआयने जुनी निवड समिती बरखास्त केली आणि आता नवीन निवड समिती स्थापन केली जाईल ज्यासाठी अर्ज देखील मागविण्यात आले आहेत. इतकंच नाही तर टी-20 फॉरमॅटमध्ये आता रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला टीमचा नवा कर्णधार बनवण्याची मागणी होत आहे.

मात्र, हार्दिक पांड्याच्या जागी रोहित शर्माला भारतीय टी-२० संघाचा कर्णधार बनवावे, हे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलमान बट्टला मान्य नाही. त्यांनी ही मागणी करणाऱ्या लोकांना लक्ष्य केले आहे

आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत सलमान बट म्हणाला की, “मला माहित नाही की ते लोक कोण आहेत जे हार्दिक पांड्याला टी-20 कर्णधार बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत आणि त्याला कर्णधार म्हणून पाहत आहेत. हार्दिक पांड्या खूप प्रतिभावान आहे यात शंका नाही आणि आयपीएलमध्ये कर्णधार म्हणूनही तो यशस्वी ठरला आहे, पण रोहित शर्माने आपली टीम मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. रोहित शर्माने २०२२ च्या टी-२० विश्वचषकात धावा केल्या असत्या तर कदाचित अशी मागणी उभी राहिली नसती.”

सलमान बट पुढे म्हणाला की, “यावेळी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये इंग्लंड चॅम्पियन झाला आणि 11 कर्णधार अपयशी ठरले, त्यामुळे सर्व संघांची कामगिरी खराब होती. विश्वचषक फक्त एकाच संघाला जिंकायचा होता. आशियातील लोकांना ताबडतोब मोठ्या बदलांची मागणी करण्याची सवय आहे. लोकांना फक्त त्यांचे मत द्यायचे असते आणि त्यामुळे ते कर्णधार बदलण्याची मागणी करू लागले, असे तो म्हणाला आहे. दुसरीकडे विश्वचषकात 11 संघांच्या कर्णधारांनी निराशा केली, तर तुम्ही सर्व संघांचे कर्णधार बदलणार का? असा सवाल देखील त्याने उपस्थित केला आहे.