नवी दिल्ली : हार्दिक पंड्याने त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला आशिया कप 2022 च्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 5 विकेटने विजय मिळवून दिला. या सामन्यात हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी करताना 3 विकेट गेहतल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. हार्दिक पंड्याला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.

हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह हार्दिक पांड्याने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. हार्दिक पांड्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिसऱ्यांदा षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

हार्दिक पांड्याने या बाबतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. महेंद्रसिंग धोनीनेही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये षटकार मारून टीम इंडियाला तीन वेळा विजय मिळवून दिला आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला आहे.

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय

  1. विराट कोहली – 4 वेळा
  2. हार्दिक पांड्या/महेंद्रसिंग धोनी – 3 वेळा