नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ‘बॅक स्ट्रेस फ्रॅक्चर’मुळे टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. यावर आज म्हणजेच ३ ऑक्टोबरला बीसीसीआयने अधिकृतरीत्या मान्यता दिली. तज्ज्ञांशी सल्लामसलत आणि तपासणी केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने हा निर्णय घेतल्याचे बोर्डाने म्हटले आहे. बीसीसीआयने असेही म्हटले आहे की, आम्ही लवकरच टी-20 विश्वचषकासाठी बुमराहच्या बदलीची घोषणा करू.
जसप्रीत बुमराहच्या बाहेर पडल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती, मात्र आज बीसीसीआयने याला अधिकृत दुजोरा दिला आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर पुन्हा कमेंट्स आणि पोस्ट्सचा पाऊस पडला आहे. लोक याला टीम इंडियासाठी मोठा झटका म्हणत आहेत.
दरम्यान, हार्दिक पांड्याचे हृदयस्पर्शी ट्विट आले आहे, ज्यामध्ये तो बुमराहला शेर म्हणत आहे. तसेच तो आणखी ताकदीने पुनरागमन करणार असल्याचे सांगितले. त्याने लिहिले, “माय जस्सी, तू नेहमीप्रमाणेच मजबूत परत येशील. खूप प्रेम” यानंतर हार्दिकने हार्ट इमोजी बनवले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये बाजी मारली होती, तेव्हा हार्दिक आणि संपूर्ण टीमला बुमराहची आठवण झाली. बुमराहला टी-20 वर्ल्ड कपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले होते.