मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या शिवाची नगरी काशीमध्ये आहे. शिल्पाने काशीला पोहोचून बाबा विश्वनाथ मंदिरात जाणून देवाचे दर्शनच घेतले नाही तर तने दशाश्वमेध घाटावरही तिची उपस्थिती दर्शविली. आता नुकताच शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून वाराणसीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये शिल्पा गंगा आरतीमध्ये सहभागी झालेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टीसोबत तिची आई देखील उपस्थित असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये गंगा घाटावर मोठी गर्दी दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जय माँ गंगे… हर हर महादेव.” व्हिडीओमध्ये शिल्पा गंगा घाटवर दिवा लावताना दिसत आहे. शिल्पाच्या या धार्मिक अवतारावर लोक भरपूर कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत. यासह नेटकरी अभिनेत्रीचे कौतुकही करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतीच ‘निकम्मा’ चित्रपटात दिसली. या चित्रपटात शिल्पासोबत अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.