फणस म्हणजे हे एक फळ आहे, एवढेच आपल्याला माहिती आहे. असे म्हंटले जाते की फणस हे त्याच्या वजनानुसार जगातील सर्वात मोठे फळ आहे. पण हे त्याच्या वजनाप्रमाणेच आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचा सगळ्यात जास्त फायदा मधुमेह रुग्णांसाठी होतो.

मधुमेह रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासाठी हिरव्या फणसाचे पीठ अत्यंत फायदेशीर ठरते.संशोधनातून असे समोर आले आहे की याने मधुमेह- २ चा धोका खूप कमी होतो.

त्यामुळे मधुमेह रुग्णांनी रोजच्या आहारात हिरव्या फणसाचे पीठ खाल्ले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊ हिरव्या फणसाच्या पिठ कशाप्रकारे फायदेशीर ठरते.

हिरव्या फणसाचे पीठ का फायदेशीर आहे?

बर्‍याच रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की टाईप-२ डायबिटीजच्या रुग्णांना रोज हिरवे फणसाचे पीठ वापरल्याने खूप फायदा होऊ शकतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हिरवे फणसाचे पीठ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये प्लाझ्मा शुगरची पातळी कमी करण्यास मदत करते. फणसाचे पीठ खाणाऱ्यांमध्ये ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन (HbA1c) चे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आढळले.

संशोधन काय सांगते

या संशोधनात ४० वयाच्या लोकांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. एका गटाला हिरवे फणसाचे पीठ आणि दुसऱ्या गटाला १२ आठवडे सामान्य पीठ दिले गेले. संशोधनात असे आढळून आले की ज्या गटाला हिरवे फणसाचे पीठ देण्यात आले होते त्यांच्यामध्ये ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिनमध्ये लक्षणीय घट झाली होती. जे लोक हे पीठ वापरतात त्यांची रक्तातील साखर ७ दिवसात कमी होते.

फणसाच्या पिठाचे फायदे

१. फणसाचे पीठ खाल्ल्याने मधुमेहासारख्या घातक आजारांवर नियंत्रण ठेवता येते.
२. टाईप-२ मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
३. उच्च रक्तदाबाची समस्या फणसाचे पीठ खाल्ल्याने नियंत्रणात राहते.
४. फणसाचे पीठ वापरल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
५. यामुळे हाडे मजबूत होतात आणि तुम्ही दीर्घकाळ तरूण राहता.

Leave a comment

Your email address will not be published.