मातृदिनानिमित्त लखनऊ विभागाने सर्व प्रवाशांचा ट्रेनमधील प्रवास सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रेनमधील प्रवाशांना लक्झरी अनुभव देण्यासाठी रेल्वेने अनेक पावले उचलली आहेत. ट्रेनमध्ये खालच्या बर्थला जोडलेली स्पेशल सीट बसवण्याची व्यवस्था देखील केली आहे.

उत्तर रेल्वेच्या लखनऊ विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक रेखा शर्मा यांनी सांगितले की, ट्रेन क्रमांक १२२२९/३० च्या थर्ड एसी बी-४ (कोच क्रमांक १९४१२९) चा बर्थ क्रमांक १२ आणि ६० खास डिझाइन करण्यात आला आहे.

त्यांनी सांगितले की, या कोचमध्ये बेबी सीटची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून आपल्या नवजात बालकांसह प्रवास करणाऱ्या मातांना आरामात प्रवास करता येईल.

आसनांचे वैशिष्ट्य म्हणजे माता त्यांच्या नवजात अर्भकांसोबत अधिक सोयीने प्रवास करू शकतात आणि गरज भासल्यास ही बेबी सीट फोल्डही करता येते. या बेबी सीटवर लहान मुलांच्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.