एक काळ असा होता की मुलींना ओझे मानले जायचे. मुलगी जन्माला आल्याने कुटुंब दु:खी होत होते. पण आता काळ बदलला आहे. मुली हे ओझे नसून आई-वडिलांचे प्रेम आणि मुलीच्या जन्माचा आनंद साजरा केला जातो.
अशात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शेळगाव येथे मुलीच्या जन्मामुळे कुटुंब आनंदी झाले आहे. तिला घरी हेलिकॉप्टर द्वारे आणण्यात आले आहे.
हेलिकॉप्टर उतरवताना तेथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलीची एक झलक पाहण्यासाठी ते उत्साहित दिसत होते. मुलीच्या वडिलांनी मुलीला हेलिकॉप्टरमधून खाली उतरवले आणि आनंदाने हातात धरून उचलून घेतले.
मुलीचे वडील विशाल जरेकर यांनी सांगितले की, आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती. त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर तिचे स्वागत खास करण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टरची व्यवस्था करून तिला घरी आणले.
व्हिडिओमध्ये मुलीचे वडील तिला हेलिकॉप्टरने घेऊन गावात उतरले आणि तेथे उपस्थित कुटुंबीयांनी मुलीचे स्वागत केल्याचे दिसून येते.
एवढेच नाही तर मुलीच्या स्वागतासाठी हेलिपॅडपासून घरापर्यंत फुलांची उधळण करण्यात आली. आश्चर्य म्हणजे शेतकरी कुटुंबाने पीक विकून या कार्यक्रमासाठी ५ लाख रुपये खर्च केले.