मुंबई : बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा पहिल्यांदाच आपल्या मुलासोबत डान्स करताना दिसला आहे. गोविंदा नाचताना आपण सगळेच अनेकदा पाहतो. पण त्याला मुलगा यशवर्धन आहुजासोबत नाचताना पाहणे हा वेगळाच आनंद आहे. जेव्हा पिता-पुत्र जोडीने पहिल्यांदा एकत्र डान्स केला तेव्हा सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. बघूया धमाकेदार डान्सचा व्हिडिओ.

अलीकडेच गोविंद पत्नी सुनीता आहुजासोबत ‘इंडियन आयडॉल 13’ च्या मंचावर पोहोचले. यावेळी बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्रही तिथे उपस्थित होते. धर्मेंद्र, गोविंदा आणि सुनीता यांनी शोमध्ये अनेक किस्से सांगितले. खूप धमाल-मस्ती देखील येथे झाली. दरम्यान, ‘इंडियन आयडॉल 13’मध्ये गोविंदाचा मुलगा यशवर्धनची धमाकेदार एन्ट्री झाली, मग तिथे काय, गोविंदा आणि यशवर्धनला एकत्र डान्स करण्याची मागणी केली.

लोकांच्या मागणीनुसार आणि शोमध्ये उपस्थित सेलिब्रिटींनी गोविंदाने आपल्या मुलासोबत डान्स करण्यास होकार दिला. गोविंदा त्याच्या जागेवरून उठतो आणि स्टेजवर जातो. यानंतर गोरिया या गाण्यावर यशवर्धनसोबत गोविंदाने भन्नाट डान्स केला. गोविंदा आणि यशवर्धन अशा पद्धतीने नाचले की प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. धर्मेंद्रपासून ते शोच्या जजपर्यंत सर्वांना गोविंदाच्या गाण्यावर नाचायला भाग पाडले.

गोविंदा आणि यशवर्धन यांना एकत्र नाचताना पाहून चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. गोविंदाप्रमाणेच त्याचा मुलगा यशवर्धनही उत्तम नृत्य करतो, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गोविंदाचा मुलगा यशवर्धन याने लंडनच्या मेट फिल्म स्कूलमधून अभिनयाचा कोर्स केला आहे. यशवर्धनने साजिद नाडियादवालाच्या ‘ढिशूम’, ‘किक-2’ आणि ‘तडप’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.

यशवर्धन फारसा प्रसिद्धीच्या झोतात राहत नाही. तो लवकरच अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे.