गुगलने आपल्या प्ले स्टोरवरून ६ अ‍ॅप्सला हटवले आहे. या अ‍ॅप्सद्वारे फोनमध्ये व्हायरसचा शिरकाव होत होता. या सर्व अ‍ॅप्समध्ये Sharkbot bank stealer मॅलवेयर होता. हा मॅलवेयर लोकांच्या बँकेची माहिती चोरी करतो. यामुळे गुगलने हे Apps प्ले स्टोरवरून तातडीने हटविले आहे. तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स असल्यास त्वरित डिलीट करा.

असा होता गैरवापर….
हे सर्व अ‍ॅप्स जिओफेसिंग फीचरद्वारे (लोकेशन) यूजर्सला ट्रॅक करत होते. ट्रॅक केल्यानंतर यूजर लॉग इन करत असलेल्या सर्व वेबसाइट आणि अ‍ॅप्सचा डेटा जमा करत असे. यूजर्सद्वारे साइटवर लॉग इन केलेला डेटा हे अ‍ॅप्स स्टोर करतात. यामध्ये लॉग इन आयडी आणि पासवर्डचा समावेश आहे. या अ‍ॅप्सचा इटली आण ब्रिटनमध्ये सर्वाधिक वापर केला जात असे.

एका रिसर्च कंपनीच्या माहितीनुसार या सर्व अ‍ॅप्समध्ये Sharkbot मॅलवेयर होता. हा यूजर्सच्या फोनमध्ये “droppers” अ‍ॅप डाउनलोड करत असे व याद्वारे यूजर्सची खासगी माहिती चोरी केली जात होती. या अ‍ॅप्सला Zbynek Adamcik, Adelmio Pagnotto आणि Bingo Like Inc सारख्या कंपन्यांना डेव्हलप केले होते. गुगलने प्ले स्टोरवरून या अ‍ॅप्सला डिलीट केले असले तरीही अनेक थर्ड पार्टी स्टोरवर हे अ‍ॅप्स अद्याप उपलब्ध आहेत.

जाणून घ्या त्या अ‍ॅप्सची नावे
Atom Clean-booster Antivirus, Antivirus super cleaner, Alpha antivirus cleaner, powerful cleaner antivirus, center security antivirus आणि Center security antivirus चा समावेश आहे.

यातील कोणत्याही अ‍ॅपचा तुम्ही वापर करत असाल तर त्वरित डिलीट करा. कारण, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. तुमचा खासगी डेटा चोरी करून हॅकर्सद्वारे बँक खात्यातील पैसे काढले जातात. त्यामुळे फोनमध्ये हे अ‍ॅप्स असल्यास त्वरित डिलीट करा.

Leave a comment

Your email address will not be published.