महाअपडेट टीम 4 फेब्रुवारी 2022: महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री मा.ना.श्री.राजेशजी टोपे यांच्यासह आमदार अशोक पवार यांनी व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड, जातेगाव बुद्रुक, ता.शिरूर, जि.पुणे येथे भेट दिली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी जागेत उत्कृष्ट साखर कारखान्याची निर्मिती केल्याबद्दल तसेच ऑटोमेशन मुळे कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून,
कारखाना उत्कृष्टपणे चालविल्याबद्दल नामदार श्री.राजेशजी टोपे साहेबांनी
कारखान्याचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर श्री.संदीप तौर आणि कारखाना प्रशासनाचे कौतुक केले.
या वेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे युवा नेते ऋषीराज पवार उपस्थित होते.