बॉलिवूड आणि पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिध्द गायक बी प्राकचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, बी प्राकने नुकतच त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

प्राक दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर पत्नी मीरा बच्चनसोबतचा एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना बी प्राकने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लाइफ टाईम #summer2022 च्या प्रेमात पडण्यासाठी नऊ महिन्यांची तयारी’. बी प्राकने त्यांच्या लग्नाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त गरोदरपणाची घोषणा केली आहे.

बी प्राक आणि मीरा आधीच एका मुलाचे आई-वडील आहेत. मीरा आणि प्राक यांच्या पहिल्या मुलाचा जन्म 2020 मध्ये झाला. या जोडप्याने 2019 मध्ये चंदीगडमध्ये लग्न केले होते. हे कपल सतत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत एकमेकांप्रति आपल्या प्रेमाचा वर्षाव करत असतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *