देशात करोनाची परिस्थितीत अटोक्यात आल्यानं केंद्र सकारनं एक एप्रिलपासून निर्बंध मागे घेण्याची सूचना सर्व राज्यांना केली आहे.
त्यानुसार आता महाराष्ट्रातही मास्क वगळता अन्य निर्बंध काढून टाकण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालना येथे मंत्री टोपे यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितलं की, एक एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागं घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. इतर बहुतांश निर्बंध काढून टाकले जाणार आहेत. मात्र, मास्क वापरणं आवश्यक आहे.
त्यासंबंधीची कारवाईही सुरूच राहणार आहे. करोनासंबंधी गेल्या दोन वर्षांपासून लावण्यात आलेले इतर सर्व निर्बंध आता काढून टाकण्यात येणार आहेत.
त्यामुळं एप्रिलमध्ये येणारे सण-उत्सवही नागरिक खुलेपणानं साजरे करून शकणार आहेत, असंही टोपे म्हणाले. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार दोन दिवसांत यासंबंधीची अधिसूचना राज्य सरकारकडून जारी केली जाऊन एक एप्रिलपासून ती लागू होणार आहे.