मुबई : दिल्ली कॅपिटल्ससाठी एक आनंदाची बातमी आहे, स्टार अष्टपैलू मिचेल मार्श आणि यष्टीरक्षक फलंदाज टिम सेफर्ट कोविड -19 मधून बरे झाल्यानंतर संघात परतले आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझीने बुधवारी ही माहिती दिली.
अष्टपैलू मिचेल मार्श आणि यष्टीरक्षक फलंदाज टिम सेफर्ट, ज्यांना गेल्या आठवड्यात कोविड-19 ची लागण झाली होती, क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर दोन्ही खेळाडू सरावासाठी संघात सामील झाले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याच्यापूर्वी मिचेल मार्श आणि टीम सेफर्ट हे दिल्ली कॅपिटल्सच्या सहकारी खेळाडूंसोबत सराव करताना दिसले.
दिल्ली कॅपिटल्सने या दोन क्रिकेटपटूंचा सत्रादरम्यान सराव करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फ्रेंचाइजीने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘चांगले वाटत आहे. तुम्हांला सराव करताना पाहून आनंद झाला.’