भारतात सध्या लग्नाचा सिजन सुरु झाला आहे. अशात लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस हे अनेकांच्या मनात कायमस्वरूपी कोरले जात असतात. त्यामध्ये बऱ्याच जोडप्यांचे हनिमूनला जाण्यासाठी ठिकाण निवडणे खुप आवगड आहे. कारण अनेक ठिकाणे आहेत जी हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहेत. 

हनीमून कपलला रोमँटिक क्षण घालवण्यासाठी भारी आहेत. जाणून घेऊया कोणती ठिकाणे सुंदर आहेत हनिमूनसाठी

मनाली – मनाली हे हिमाचल प्रदेशातील सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन आहे. पर्वत, फुले आणि बागांमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवू शकता. तुम्ही येथे ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, कॅम्पिंग आणि रॉक क्लाइंबिंगसारख्या साहसी क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकता.

आग्रा – आग्रा येथील ताजमहाल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. हे ठिकाण जोडप्यांना भेट देण्यासाठी योग्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळी ताजमहाल बघायला जाऊ शकता. तुमच्यासाठी ही खरोखरच एक संस्मरणीय सहल असेल.

गुलमर्ग – जम्मू-काश्मीरमध्ये वसलेले गुलमर्ग निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे तुम्ही दल सरोवर, फुलांनी भरलेली मैदाने आणि सुंदर पर्वतांच्या दृश्यांचा आनंद घेऊ शकता. हे खूप सुंदर ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या ठिकाणी जाण्याचा प्लॅन नक्कीच बनवावा.

ऊटी – हे एक अतिशय शांत ठिकाण आहे. येथील नैसर्गिक दृश्‍यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. उटी हे तामिळनाडूमध्ये आहे. कामराज सागर तलाव, उटी तलाव आणि बोटॅनिकल गार्डन यासारख्या अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शांततेचे क्षण घालवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published.