हिवाळ्यात बरेच लोक सर्दी- खोकला यांसारख्या समस्यांनी त्रस्त असतात. अशात ते दूर करण्यासाठी आल्याचा वापर करत असतात. तसेच हिवाळ्यात चहा बनवतानाही त्यात मोठ्या प्रमाणात लोक आले वापरतात. पण याकाळात आले घरात जास्तकाळ ठेवल्यास ते लवकर खराब होते.

अशा परिस्थितीत आले साठवण्याचा योग्य मार्ग जाणून घेतल्यास, तुम्ही आले दीर्घकाळ ताजे ठेवू शकता. आले बरेच दिवस ताजे ठेवण्यासाठी, आपण ते साठवण्यासाठी काही टिप्स फॉलो करू शकता. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात आले साठवण्याच्या पद्धती.

अॅल्युमिनियम फॉइल वापरा

हिवाळ्यात आले ताजे ठेवण्यासाठी तुम्ही अॅल्युमिनियम फॉइलची मदत घेऊ शकता. यासाठी आलेला अॅल्युमिनियम फॉइलमध्ये चांगले गुंडाळून ठेवा. यामुळे आले बरेच दिवस खराब होणार नाही आणि आल्याचा वापर तुम्ही स्वयंपाकात सहज करू शकाल.

लाकडी टोपल्या वापरा

हिवाळ्यात आले साठवण्यासाठी तुम्ही लाकडी टोपली देखील वापरू शकता. यासाठी लाकडी टोपली नीट स्वच्छ करावी. आता या टोपलीवर न्यूज पेपर गुंडाळा आणि नंतर टोपलीत आले पसरून ठेवा. आता ही टोपली घरातील थंड ठिकाणी ठेवा. यामुळे आले बरेच दिवस खराब होणार नाही.

व्हिनेगर मध्ये साठवा

आले खराब होण्यापासून रोखण्यासाठी व्हिनेगरचा वापरही उत्तम ठरू शकतो. व्हिनेगरच्या अम्लीय स्वरूपामुळे आले दीर्घकाळ ताजे ठेवण्यास मदत होते. यासाठी एअर टाईट डब्यात व्हिनेगर भरा. आता या डब्यात आले टाका आणि चांगले बंद करा. यामुळे तुमचे आले जास्त काळ ताजे राहील.

आले कोरडे करा

ओले आले जास्त वेळ ठेवल्याने ते कुजते. म्हणून, नेहमी कोरडे झाल्यानंतर आले साठवा. अशावेळी आले पुसून उन्हात वाळवावे. दुसरीकडे, कोरडे आले सडण्यापासून रोखण्यासाठी, तुम्ही त्यात हळद गुंडाळू शकता. याशिवाय आले कापल्यानंतरही ते लवकर खराब होते. त्यामुळे आले जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ते कापणे टाळा.