मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाने पहिल्यांदा बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता, तर आता हा चित्रपट ओटीटीवर थैमान घालत आहे. हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे आणि तेव्हापासून आलियाला पुन्हा एकदा खूप प्रशंसा मिळत आहे.
केवळ देशातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडतो आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर एका आठवड्यात जागतिक स्तरावरील नंबर वन नॉन-इंग्रजी चित्रपट बनला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘गंगूबाई काठियावाडी’ आतापर्यंत नेटफ्लिक्सवर 13.82 दशलक्ष तास पाहिला गेला आहे आणि कॅनडा, युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि UAE सह 25 देशांमध्ये टॉप 10 मध्ये चित्रपट राहिला आहे. या चित्रपटात आलियाने ‘गंगूबाई’ची भूमिका साकारली आहे. आलिया आणि तिची आई सोनी राजदान यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी इंस्टाग्राम स्टोरी शेअर शेअर आहे.
Chand humesha sabse upar rehta hai, aur Gangu bhi 🤍
— Netflix India (@NetflixIndia) May 4, 2022
Thank you for all your love 🥰 pic.twitter.com/7tCBGlJLGF
एका वृत्तानुसार नेटफ्लिक्सवरील चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना आलिया म्हणाली, “प्रेक्षक नेटफ्लिक्ससह भारतात आणि त्यापलीकडे चांगल्या कथा कशा शोधू शकतात हे पाहणे आश्चर्यकारक आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ला जगभरातील प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमाने मी अवाक झाले आहे. मला नेहमीच संजय लीला भन्साळींसोबत काम करायचं होतं.”
आलिया भट्ट स्टारर चित्रपट गंगूबाई काठियावाडी या वर्षी 25 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आलियाने चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची वाहवा मिळवली आणि चांगले कलेक्शनही केले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते, तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 129.10 कोटी रुपये आहे.