अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा सीईटी, नीट आणि जेईई सारख्या प्रवेश परीक्षांसाठी योग्य प्रकारे सराव व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी मोफत “ऑनलाइन मॉक टेस्ट पेपर सिरीयल सेट” हा उपक्रम सुरु केला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.परीक्षा संपल्यांनंतर या प्रवेश परीक्षांचा अभ्यास व सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

अधिकाधिक प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत सोडविण्याचा सराव व्हावा यासाठी या चाचण्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना www.divyadholay.com या पोर्टलवर नावनोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेनुसार प्रत्येक परीक्षेच्या ३० प्रश्नांची प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.