महाअपडेट टीम : 16 मार्च 2022 : गुनाट सोसायटीच्या निवडणूकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतिश कोळपे सर आणि गुनाट गाव’चे सरपंच गणेश कोळपे यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली होती.
दोघांनीही एकमेकांच्या विरोधात फाॅर्म भरला होता. त्यामुळे मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. आणि हा राजकीय संघर्ष टाळण्याचं मोठं आव्हान ग्रामस्थांपुढे होतं.
मागच्या पंचवार्षिक गुनाट सोसायटीच्या निवडणूकीत शिरूर पंचायत समिती’चे माजी सभापती बाजीराव कोळपे यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्वं राखलं होतं. यावर्षीही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत होती. गुनाट गाव’चे सरपंच गणेश कोळपे यांनी पॅनल उभा करुन निवडणूकीमध्ये रंगत आणली होती.
पण समोर बाजीराव कोळपे यांच्या सारखा अनुभवी, शांत, संयमी, मुरब्बी पॅनल प्रमुख असल्यामुळे गणेश कोळपे यांच्या सारख्या नवख्या पॅनल प्रमुखाला ते आव्हान पेलवणं तितकं सोपही नव्हतं.
आणि म्हणून गणेश कोळपे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मोठा राजकीय संघर्ष टाळला. बाजीराव कोळपे यांच्या पॅनलला पाठिंबा देऊन निवडणूकीतून माघार घेतली. १२ जागा बिनविरोध झाल्या. एका जागेसाठी निवडणूक लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
बाजीराव कोळपे यांनी सलग दुसर्यांदा गुनाट सोसायटीवर सरशी साधली आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सरपंच गणेश कोळपे आणि ग्रामस्थांनी मोलाची भूमिका बजावली.
बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढील प्रमाणे :
सतिश कोळपे सर
राजेंद्र कोळपे
भुजंगराव कर्पे
सचिन कर्पे
अनिल कर्पे
संभाजी गाडे
नानासो भगत
सोमनाथ गिरमकर
प्रीतम काळे
संध्या भैरट
सुनिता भगत
आप्पासाहेब भगत !