महाअपडेट टीम, 2 फेब्रुवारी 2022 : पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी बाबर यांना कोरोनाची लागण झाली झाल्याने त्यांच्यावर ज्युपिटर रूग्णालयात उपचार होते परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे.
गजानन बाबर हे 78 वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते, त्यातच त्यांना कोरोनाने गाठलं. त्यामुळे त्यांना उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांनी कोरोनातून मुक्त होऊन ते 26 जानेवारीला ते त्यांच्या बँकेत ध्वजारोहणासाठी हजर होते परंतु पुन्हा त्यांना पोटाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
गजानन बाबर यांची कारकीर्द…
गजान बाबर यांनी पिंपरी चिंचवडमध्ये 1974 साली गजानन बाबर यांनी शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना केली होती. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं होतं.
बाबर यांनी 3 वेळा नगरसेवकपद भुषावले होते. तर हवेली मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी 2009 झाली त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची खासदारकी भूषवली होती.