तुम्हाला त्वचा नेहमीच तरूण आणि चेहऱ्यावरची चमक कायम राहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण पार्लर आणि स्किन केअर ट्रीटमेंटवर खूप पैसे खर्च करतात. पण त्याचा जास्त प्रमाणात वापर केल्याने आरोग्याला हानिकारक ठरू शकते.

चला जाणून घेऊया त्वचेची काळजी घेण्याच्या या टिप्स.

१. सनस्क्रीनचा वापर

उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरण्याची खात्री करा. हे तुम्हाला हानिकारक किरणांपासून वाचवते. हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा SPF ३० वरील सनस्क्रीन लावून नक्कीच बाहेर पडा. तेलकट त्वचा असणाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष करू नये.

२. त्वचेला हानिकारक गोष्टी लावू नका

आपल्या सर्वांची त्वचा वेगळी आहे, त्यामुळे सर्व उत्पादने प्रत्येकासाठी योग्य असतीलच असे नाही. कोणतेही प्रोडक्ट लावल्यानंतर चेहऱ्यावर जळजळ, खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादी समस्या येत असतील तर ते स्किन केअर प्रोडक्ट वापरणे बंद करा.

३. दिवसातून ३ वेळा चेहरा स्वच्छ करणे

जर आपण आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ ठेवला तर अर्ध्या समस्या दूर होऊ शकतात. कारण, चेहऱ्यावर साचलेली घाण आणि तेल हे त्वचेच्या बहुतांश समस्यांचे कारण असते. त्यामुळे दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्यास विसरू नका.

४. आठवड्यातून दोनदा हलके स्क्रब करा

चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा स्क्रब करा. पण यासाठी हलक्या स्क्रबचा वापर करा. तुम्ही घरी बनवलेले स्क्रब वापरू शकता.

५. सौंदर्य उत्पादनांमध्ये या गोष्टी असाव्यात

जेव्हा तुम्ही एखादे सौंदर्य उत्पादन निवडता तेव्हा त्यामध्ये आवश्यक पोषण असते याची खात्री करा. जसे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फॅटी ऍसिडस् इ. जेणेकरून त्वचेला निरोगी बनवणारे घटक मिळू शकतील. यामुळे तुमची त्वचा दीर्घकाळ निरोगी आणि चमकदार राहील.

Leave a comment

Your email address will not be published.